For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोमालियानजीक दोन जहाजांचे अपहरण

07:00 AM Aug 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
सोमालियानजीक दोन जहाजांचे अपहरण
Advertisement

अपहृतांमध्ये 22 भारतीयांचा समावेश : एका जहाजातून तुर्कियेच्या शस्त्रास्त्रांची वाहतूक

Advertisement

 वृत्तसंस्था/सना

येमेन आणि सोमालियाच्या किनाऱ्यानजीक दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सागरी चाच्यांनी दोन जहाजांचे अपहरण केले आहे. या दोन्ही जहाजांवर एकूण 22 भारतीय नागरिकांसमवेत चालक दलाचे 30 सदस्य सवार होते. एमटी सिबू 1 वर 16 आणि एम/व्ही लुटुफवर 6 भारतीय नागरिक होते. सोमालियानजीक अपहरण करण्यात आलेल्या जहाजावर तुर्कियेची शस्त्रास्त्रs आणि संचार-उपग्रहीय उपकरणे होती. तर एम/व्ही लुटुफ अन् त्याच्या चालक दलाची वर्तमान स्थिती अद्याप पूर्णपणे स्पष्ट नाही. 20 ऑगस्ट रोजी येमेनच्या किनाऱ्यापासून सुमारे 30 सागरी मैल अंतरावर एडनच्या उपसागरात इरिट्रियाचा ध्वज असलेला तेल टँकर एमटी सिबू 1 ला शस्त्रसज्ज सागरी चाच्यांनी स्वत:च्या ताब्यात घेतले. जहाजावर चालक दलाचे एकूण 20 सदस्य होते, ज्यात 16 भारतीय नागरिक सामील आहेत. या घटनेनंतर भारतीय यंत्रणा स्थितीवर सातत्याने नजर ठेवून आहेत. प्रारंभिक माहितीनुसार जहाजावरील सर्व भारतीय सुरक्षित आहेत.

Advertisement

पुंटलँड किनाऱ्यानजीक लक्ष्य

दुसऱ्या घटनेत सोमालियाच्या पुंटलँड किनाऱ्यानजीक कॅमेरूनचा ध्वज असलेले कार्गो जहाज एम/व्ही लुटुफचे सागरी चाच्यांनी अपहरण केले. जहाजावरील चालक दलाच्या 10 सदस्यांमध्ये 6 भारतीय, एक तुर्कियेचा नागरिक, एक जॉर्जियन नागरिक आणि दोन सर्बियन सुरक्षारक्षक सामील आहेत. जहाजाचा मालकी हक्क पोलर मूव्हमेंट शिपिंग कंपनीसाठी आहे. अपहरणानंतर सागरी चाच्यांनी जहाज पुंटलँडच्या नुगाल किनाऱ्याच्या दिशेने नेल्याचे सोमालियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मारेयानजीक जहाजावर कब्जा

एम/व्ही लुटुफ जहाजावर पुंटलँडच्या ईयल जिल्ह्यात मारेयापासून सुमारे 3.5 सागरी मैल अंतरावर सागरी चाच्यांनी कब्जा केल्याची माहिती एका सोमालियन अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिली आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने स्वत:ची ओळख उघड करण्याची अनुमती अधिकाऱ्याला नव्हती.

तुर्कियेची शस्त्रास्त्रs अन् संचार उपकरणे

एम/व्ही लुटुफ तुर्कियेच्या शस्त्रास्त्रांची वाहतूक करत होते. या शस्त्रास्त्रांना मोगादिशू येथील तुर्कियेच्या सैन्य प्रशिक्षण केंद्रापर्यंत पोहोचविले जाणार होते. जहाजावर संचार आणि उपग्रहीय उपकरणेही होते. या घटनेबद्दल तुर्कियेच्या अधिकाऱ्यांकडून तत्काळ कुठलीच अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

सागरी चाच्यांच्या कारवाया वाढल्या

सुमारे 8 सागरी चाच्यांनी एम/व्ही लुटुफ जहाजावर कब्जा केला आहे. हाच समूह 26 एप्रिल रोजी एम/व्ही स्वार्डच्या अपहरणात सामील होता असा संशय आहे. अपहरणानंतर चाच्यांनी जहाजाला पुंटलँडच्या डांगोरोयो जिल्ह्यातील गारमाल नजीकच्या किनाऱ्याच्या दिशेने नेले आहे. या भागात सागरी चाच्यांच्या कारवाया वाढल्याने तेथे नजर ठेवली जात असल्याचे सोमालियाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

तुर्कियेचे जहाज अन् हेलिकॉप्टर दाखल

अपहरणाच्या घटनेनंतर तुर्कियेची मालकी असलेली जहाजं संबंधित सागरी क्षेत्रात दाखल झाली. या भागात तुर्कियेची हेलिकॉप्टर्स अन् ड्रोन्सकडून देखरेख ठेवली जात आहे. एका छोट्या नौकेद्वारे दोन जण अपहृत जहाजानजीक ‘खाट’ पदार्थ घेऊन पोहोचले. खाट हा एक उत्तेजक पदार्थ असून तो सोमालियात चावून खाल्ला जात असतो.

हवाई हल्ल्यात 4 ठार

छोटी नौका किनाऱ्यावर परतल्यावर तेथे हवाई हल्ला झाला, ज्यात 4 जणांचा मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाल्याचे सोमालियन अधिकाऱ्याचे सांगणे आहे, परंतु या हल्ल्याची स्वतंत्र स्वरुपात पुष्टी मिळू शकलेली नाही. हा हल्ला कुणी केला होता आणि सागरी चाचे मारले गेले का अन्य कुणी हे देखील स्पष्ट नाही.

Advertisement
Tags :

.