महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गोवंश वाहतूक प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

11:21 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

25 बैलांसह गायींची गोशाळेत रवानगी : हल्लाप्रकरणी सात जणांना अटक

Advertisement

बेळगाव : गोवंशाची बेकायदा वाहतूक व ती रोखण्यासाठी कंटेनरवर रविवारी रात्री हलगा येथील सुवर्ण विधानसौधजवळ हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून हल्लाप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त ईडा मार्टिन मार्बनँग यांनी सोमवारी सायंकाळी ही माहिती दिली. रविवारी रात्री 7 ते 7.30 या वेळेत संतप्त जमावाने सुवर्ण विधानसौधजवळ एमएच 46, बीबी 4503 क्रमांकाचा कंटेनर अडवून चालक व क्लिनरला मारहाण केली होती. बेकायदा गोवंशाची वाहतूक रोखून सुमारे 25 बैल व गायींची गोशाळेत रवानगी करण्यात आली होती. जमावाच्या मारहाणीत कंटेनरचा चालक सुनीलकुमार कृष्णा अय्यर (वय 38) व क्लिनर उमर टी. के. (वय 46) दोघेही राहणार चेरकला, ता. जि. कासरगोड, केरळ हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. यमकनमर्डीहून केरळला बेकायदा गोवंशाची वाहतूक करण्यात येत होती.

Advertisement

कंटेनरचालक व क्लिनरवर कलम 4, 5, 12 (1), (2) दि कर्नाटक प्रिव्हेन्शन ऑफ स्लॉटर अँड प्रिव्हेन्शन ऑफ कॅटल अॅक्ट-2020 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चालक सुनीलकुमार याने दिलेल्या फिर्यादीवरून 50 हून अधिक जणांवर भादंवि 143, 147, 148, 307, 324, 504, 506, सहकलम 149 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी रात्री ताब्यात घेण्यात आलेले 25 बैल व गायी श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडुस्कर यांच्या पुढाकारातून गोशाळेला पाठविण्यात आले आहेत. यावेळी गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता. मारहाणीतील जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. रविवारी रात्री उशिरा त्यांना खासगी इस्पितळात हलविण्यात आले आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article