महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बलात्कार-हत्या प्रकरणी दोघांना फाशीची शिक्षा

06:27 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजस्थानमधील पॉक्सो न्यायालयाचा निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

Advertisement

राजस्थानमधील शाहपुरा जिल्ह्यातील कोत्री येथे 14 वषीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळणाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या बहुचर्चित प्रकरणात भिलवाडा पॉक्सो कोर्ट-2 ने सोमवारी आपला निर्णय दिला. त्यानुसार कालू आणि कान्हा या दोन्ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात गेल्या आठवड्यात न्यायालयाने नऊ मुख्य संशयित आरोपींपैकी दोघांना दोषी ठरवले होते. तर सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

गेल्यावषी ऑगस्टमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला कोळशाच्या भट्टीत जिवंत जाळण्यात आले होते. या घटनेनंतर संतापाची लाट उसळल्याने राज्यात प्रचंड उद्रेक झाला होता. पोलिसांनी महिनाभरात 473 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यात अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. न्यायालयानेही ही हत्या जघन्य गुन्हा मानली आहे. सुनावणीवेळी पीडितेचे आई-वडीलही न्यायालयात हजर होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article