For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लैंगिक अत्याचार प्रकरणी दोघांना २० वर्षे कारावास

05:58 PM Jan 23, 2026 IST | अनुजा कुडतरकर
लैंगिक अत्याचार प्रकरणी दोघांना २० वर्षे कारावास
Advertisement

ओरोस : प्रतिनिधी

Advertisement

एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याच्या आरोपाखाली दोषी धरून आदित्य उर्फ मंदार परब (२४ रा. आरोस गावठाण, ता. सावंतवाडी) आणि किरण परब (३० रा. न्हावेली रेवटीवाडी) या दोघांना जिल्हा विशेष न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी प्रत्येकी २० वर्षे कारावास आणि प्रत्येकी २० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रंजना पाटील आणि तत्कालीन अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.

Advertisement
Advertisement
Tags :

.