For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

07:39 AM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू
Advertisement

रामदुर्ग तालुक्यातील घटनेने हळहळ

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

तलावात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. रामदुर्ग तालुक्यातील बन्नूर येथे ही घटना घडली असून रामदुर्ग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

Advertisement

मनोज विठ्ठल बडीगेर (वय 10), फारुख दादासाब चिल्लेदार (वय 9) दोघेही राहणार बन्नूर अशी त्या दुर्दैवी मुलांची नावे आहेत. शनिवारी सकाळी गावाजवळील तलावानजीक हे दोघे प्रात:र्विधीसाठी गेले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे. तलावातील चिखलात पाय रुतल्यामुळे या दोघा जणांचा बुडून मृत्यू झाला. या दोघा जणांसमवेत असलेल्या आणखी एका मुलाने ही गोष्ट गावकऱ्यांना सांगितली. पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Advertisement
Tags :

.