For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन रशियन युवतींचा मित्राकडूनच खून

12:14 PM Jan 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
दोन रशियन युवतींचा मित्राकडूनच खून
Advertisement

हरमल, मोरजी येथील घटनांमुळे पेडणे तालुका हादरला, संशयिताला अटक, गुन्हा नोंद 

Advertisement

पेडणे : हरमल व मोरजी येथे रशियन पर्यटकाकडून दोन रशियन मैत्रिणींचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली. यामुळे पेडणे तालुका हादरला आहे. मांद्रे पोलिसांनी संशयिताच्या वेगवेगळ्या पद्धतीने जबानी घेतल्या त्यामध्ये एक मैत्रिण हरमल येथे तर दुसरी मैत्रिण मोरजी येथे वास्तव्यास होती. त्यांचा खून केल्याचे उघडकीस आल्याची माहिती दिली. मांद्रे पोलिसांना त्याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. मांद्रे पोलिस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियन नागरिक अलेक्सी लिओनोव्ह (37 वर्षे) या संशयित आरोपीला अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयिताची मैत्रिण रशियन नागरिक एलिना कास्तानोव्हा (वय 37) हरमल येथे असलेल्या भाड्याच्या खोलीत रहात होती.

तेथे जाऊन तिचे दोरीने हातपाय बांधले आणि तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. शरीरावर अनेक जखमा असून तसेच धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याचे उघडकीस आले आहे. हरमल गिरकरवाडा येथे एलीना कास्तानोव्हा या 37 वर्षीय रशियन युवतीचा आलेक्सेई लिओनोव (37) याने गळा चिरून खून केल्यानंतर मोरजी मधलावाडा येथील एलिना या रशियन महिलेचा दुसऱ्या वेळी त्याच पद्धतीने खून करण्याची घटना घडली. या घटनेची मांद्रे पोलीस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांना माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक सलीम शेख, मोपा पोलिस निरीक्षक निनाद देऊलकर या पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मोरजी आणि हरमल दोन्ही मृतदेह बांबोळी येथे शवचिकित्सासाठी पाठवण्यात आले. पुढील तपास मांद्रे पोलिस करत आहेत.

Advertisement

एकाच पद्धतीने दोन्ही खून

सदर संशयिताने मोरजी येथे राहत असलेल्या एलिना नामक या अन्य रशियन युवतीशी आपले प्रेम संबंध जोडले होते व त्या युवतीने अन्य कुणाशी संबंध ठेवल्याच्या संशयावरून संशयिताने खून केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मधलावाडा मोरजी येथे एका भाड्याच्या खोलीत मिस एलिना राहत होती. तिचाही खून त्याच पद्धतीने करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement
Tags :

.