For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बागा कळंगुट येथील अपघातात दोघा राजस्थानी तरुणांचा मृत्यू

03:06 PM Apr 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
बागा कळंगुट येथील अपघातात दोघा राजस्थानी तरुणांचा मृत्यू
Advertisement

म्हापसा : कळंगुट-बागा रस्त्यावर काल रविवारी सकाळी दोन दुचाक्यांमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला. अरुण उघरेजिया (25 वर्षे, सध्या राहणारा कांदोळीचा पण मूळ गुजरात) आणि करण गुंडांची (28 वर्षे, सध्या राहणारा गिरी-बार्देशचा पण मूळ राजस्थान येथील) अशी मयतांची नावे आहेत. हा अपघात रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. मागे बसलेले अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बांबोळी येथे गोमेकॉत उपचार सुरू आहेत. दरम्यान, मयत तरुण दोघेही एका क्लबमध्ये कामाला होते. सकाळी खोलीवर परतत असतांना दोन दुचाक्यांच्या दुर्दैवी अपघातात सर्वप्रथम अरुण उघरेजिया याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अऊण गुंडांची याचा बांबोळीत उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. उपनिरिक्षक स्नेहा सावळ यांनी घटनेचा पंचनामा केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.