महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वायुदलाचे विमान कोसळून दोन पायलट्सचा मृत्यू

06:38 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तेलंगणामध्ये प्रशिक्षण विमानाला दुर्घटना

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

तेलंगणामध्ये हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळून सोमवारी दोन वैमानिक हुतात्मा झाले. तेलंगणामध्ये मेडक जिह्यात भारतीय हवाई दलाचे टेनर विमान कोसळल्याची माहिती हवाई दलाकडून देण्यात आली. या दुर्घटनेवेळी विमानात एक टेनर पायलट आणि एक टेनी पायलट होते. या अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या 8 महिन्यांतील हवाई दलाचा हा तिसरा विमान अपघात आहे. यापूर्वी जूनमध्ये प्रशिक्षणार्थी विमान किरणला अपघात झाला होता. मे महिन्यात मिग-21 विमान कोसळून तीन वैमानिकांचा मृत्यू झाला होता.

तेलंगणातील दिंडीगुल येथील वायुसेना अकादमीमधील पायलट प्रशिक्षण विमानाला सोमवारी सकाळी 8.55 वाजता अपघात झाला. या विमान अपघातात हवाई दलाच्या दोन वैमानिकांचा मृत्यू झाल्याचे भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातग्रस्त विमान सोमवारी सकाळी वायुसेना अकादमीतून नियमित प्रशिक्षणासाठी निघाले होते. पण वाटेत या विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर काही मिनिटांतच विमान जळून खाक झाले. ज्या ठिकाणी विमान कोसळले त्या ठिकाणी खूप मोठे दगडही होते. अपघातानंतरचा एक व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये विमान जळताना दिसत आहे. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुऊ आहे. वायूदलाकडून या अपघाताची चौकशी करण्यात येत आहे. तेलंगणामध्ये झालेल्या विमान अपघातावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शोक व्यक्त केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article