मिरजेत भरवस्तीत दोघांकडून गोळीबार
मिरज :
शहरातील इसापूरे गल्ली येथे रविवारी सायंकाळी भरवस्तीत हवेत गोळीबार केल्याचा प्रकार घडला. तालुका क्रीडा संकुलात फुटबॉल खेळण्याच्या कारणातून दोन गटात झालेल्या किरकोळ वादावादीनंतर एका गटातील दोघा तऊणांनी दुसऱ्या गटातील तऊणांच्या घरासमोर जावून दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार केल्याचा संशय आहे. हवेत गोळीबार केल्यानंतर परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. याबाबत मिलींद विलास पाटोळे यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली असून, त्यांनी दोघांवर संशय व्यक्त केला आहे. यातील एका संशयीताला पोलिसांनी पिस्तूलासह ताब्यात घेतल्याचे समजते. मात्र, दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी संशयीताचे नांव व घडलेल्या गुह्याचा तपशील सांगितला नाही.
मिलींद पाटोळे यांनी दिलेली तक्रार व घटनास्थळावऊन मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास इसापूरे गल्ली येथे दोघे तऊण एका काळ्या दुचाकीवऊन आले. रस्त्यालगत असलेल्या बोळात एका घराच्या दिशेने दोन गोळ्या फायरिंग केल्या. परिसरात फटाक्यांसारखा मोठा आवाज आला. गोळीबार केल्याचा आरडाओरडा सुरू होताच काही तऊणांचे टोळके धावत आले. तेवढ्यात दुचाकीवरील दोघे पसार झाले. तऊणांच्या दुसऱ्या गटाकडूनही शिवीगाळ कऊन आरडाओरडा सुरू झाल्याने भयभीत नागरिकांनी घरांचे दरवाजे बंद केले.
बंदूकीतून गोळ्या झाडून तऊणांनी दहशत निर्माण केल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस घटनास्थळी आले. तोवर जमाव पांगला होता. पोलिसांनी स्थानिक रहिवाशांकडे चौकशी केली. मिलींद पाटोळे या रहिवाशाची तक्रार घेतली. सदर तक्रारीनुसार, तालुका क्रीडा संकुल येथे फुटबॉल खेळताना गुन्हेगारी तऊणांच्या दोन गटात वादावादीचा प्रकार घडला होता. या वादाचा राग मनात धरून इसापुरे गल्ली येथील तऊणांशी परत वाद झाला. यावेळी गावठी बनावटीच्या पिस्तूलमधून दोन जिवंत काडतुसे हवेत गोळीबार कऊन दुचाकीवऊन दोघे तऊण पळून गेले, असे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, गोळीबार प्रकरणी दोघा संशयीतांची नांवे निष्पन्न झाली आहेत. यातील एका संशयीताला पिस्तूलासह ताब्यात घेतल्याची चर्चा होती. मात्र, दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी संशयीताचे नांव उघड केले नाही. केवळ गुन्हा दाखल कऊन तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.