For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चारचाकीच्या धडकेत सावंतवाडीतील दोघे गंभीर

11:08 AM Mar 03, 2026 IST | अनुजा कुडतरकर
चारचाकीच्या धडकेत सावंतवाडीतील दोघे गंभीर
Advertisement

माजगाव येथे सोमवारी रात्री अपघात ; अपघातानंतर चारचाकी चालकाचे पलायन

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

मोपा विमानतळावरून आपली ड्युटी संपवून सावंतवाडीत घरी येताना काल सोमवारी रात्री माजगाव मुंबई - गोवा महामार्गावर मोटरसायकलस्वार संतोष नारायण सावंत (रा.कोलगाव,सावंतवाडी )आणि जोसेफ डिसोजा (रा. जुना बाजार, सावंतवाडी )या दोघांना चारचाकी वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला . या अपघातात हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. कोलगाव येथील संतोष सावंत यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर डिसोजा यांची प्रकृती सध्या स्थिर आहे असे सांगण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पोलीस अधिकारी मनोज राऊत व श्री लोकरे अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.