For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गांजा विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या गोकाकच्या दोघा जणांना अटक

12:22 PM Jul 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
गांजा विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या गोकाकच्या दोघा जणांना अटक
Advertisement

बेळगाव : अमलीपदार्थ मुक्त बेळगावसाठी कारवाईचा सपाटा सुरूच आहे. जिल्हा पोलिसांनीही अमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. गोकाक येथील दोघा जणांना अटक करून त्यांच्याजवळून 1 किलो 140 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. चिकोडी तालुक्यातील चिंचणी क्रॉस बसथांब्याजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा सीईएनचे पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवार दि. 2 जुलै रोजी दुपारी ही कारवाई केली आहे. अक्षय मल्लाप्पा बुसण्णावर,मंजुनाथ पुंडलिक सुभानजी दोघेही राहणार गोकाक अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. त्यांच्यावर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गांजा विक्री करण्यासाठी जाताना हे दोघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.