For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दोन अधिकारी निलंबित

01:11 PM Jan 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दोन अधिकारी निलंबित
Advertisement

‘बर्च नाईट क्लब’ची पाहणी न करता प्रमाणपत्रे दिल्याचा ठपका

Advertisement

पणजी : हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबच्या आग घटनेप्रकरणी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. बर्च नाईट क्लबची पाहणी न करताच प्रमाणपत्रे दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये चैतन्य साळगावकर व कनिष्ठ अभियंता विजय कानसेकर यांचा समावेश आहे, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष लेव्हीन्सन मार्टिन्स यांनी दिली.

हडफडेतील बर्च क्लबमध्ये सहा डिसेंबर रोजी आग लागून यात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणाशी संबंधित म्हणून तत्कालीन पंचायत संचालिका सिद्धी हळर्णकर, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन सचिव डॉ. शर्मिला मोंतेरो व हडफडे पंचायतीर्च सचिव रघुवीर बागकर यांच्यावर कारवाई केली होती. आता वरील दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकीत यादव यांच्याकडून बर्च नाईट क्लब आग दुर्घटनेचा अहवाल आला आहे. त्यात काही सरकारी अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार अनेक सरकारी अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश खात्यांच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत.

Advertisement

सील केलेल्या क्लबना प्रमाणपत्र नाहीच

सील केलेल्या क्लबना अग्निशमाक व आपत्कालीन सेवा विभागाने कोणतेही नवे अग्निसुरक्षा प्रमाणपत्र दिलेली नाही. ज्या क्लबना सील केले आहे, त्यांचे सध्या अग्निसुरक्षेबाबत ऑडिट सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही क्लबला नव्याने ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही आणि तसे देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे दलाचे संचालक नितीन रायकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हडफडे पंचायत सचिव रघुवीर बागकर अखेर बडतर्फ

हडफडेतील बर्च क्लबमध्ये 25 जणांचे बळी घेणारे अग्नितांडव घडण्यात कारणीभूत ठरलेल्या हडफडे पंचायत सचिव रघुवीर बागकर याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. भागकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यापूर्वी फरार झाला होता. त्यानंतर त्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. आता पंचायत खात्याच्या संचालकांनी रघुवीर बागकर यांला सेवेतून बडतर्फ केले आहे.

Advertisement
Tags :

.