जिल्हा परिषदसाठी कुडाळ तालुक्यातून दोन उमेदवारी अर्ज
04:47 PM Jan 20, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
कुडाळ । प्रतिनिधी
Advertisement
कुडाळ तालुक्यातून भानुदास सूर्यकांत रावराणे यांनी (२८ )पावशी जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष म्हणून आपला पहिला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याकडे सादर केला आहे. तर सखाराम उर्फ पांडू चंद्रकांत खोचरे यांनी (32 )घावनळे जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून आपला उमेदवारी अर्ज सादर केला.मंगळवार 20 जानेवारी रोजी सायंकाळपर्यंत कुडाळ तालुक्यातून केवळ दोनच अर्ज दाखल झाले आहेत. उद्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची अर्ज सादर करण्यासाठी गर्दी होणार आहे .
Advertisement
Advertisement