For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी दोन नवीन व्हीलचेअर्स

05:26 PM Aug 23, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी दोन नवीन व्हीलचेअर्स
Advertisement

ठाकरे सेनेच्या रुपेश राऊळ यांचा पुढाकार

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी दोन नवीन व्हिलचेअर्स उपलब्ध करुन दिल्या आहेत.विशेषतः जेष्ठ नागरिक दिव्यांग आणि आजारी प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.गेल्या काही दिवसांपासून प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर जाण्यासाठी वृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना मोठ्या अडचणी येत होत्या.या गैरसोयींची दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची चर्चा केली.या चर्चेतून व्हिलचेअर्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि प्रत्यक्ष तुतारी एक्सप्रेस सुटण्यापूर्वी या व्हिलचेअर्स रेल्वे स्थानक प्रमुख अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या.यावेळी बोलताना रुपेश राऊळ म्हणाले की,येत्या गणेश चतुर्थीच्या सणासाठी मोठ्या संख्येने प्रवासी येणार आहेत.या व्हिलचेअर्समुळे गरजू प्रवाशांची गैरसोय दूर होईल ठाकरे शिवसेना कायमच सावंतवाडी टर्मिनसवर पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेसाठी सहकार्य करत राहील.या सेवेबद्दल स्टेशन मास्तर दिनेश चव्हाण यांनी प्रवाशांच्या वतीने आभार मानले.आणि भविष्यातही असेच सहकार्य मिळत राहील अशी आशा व्यक्त केली.या प्रसंगी माजी सभापती रमेश गावकर,वेत्ये सरपंच गुणाजी गावडे,आरोंदा उपसरपंच आबा केरकर,कोकण रेल्वेचे एरिया सुपरवायझर विजय सामंत,सिनियर स्टेशन मास्तर दिनेश चव्हाण,ॲान ड्युटी मास्तर अनुराधा पवार,कमर्शियल सिनियर क्लार्क लक्ष्मण परब,शिवसेनेचे विभागप्रमुख सुनिल गावडे,विनोद काजरेकर,संजय तानावडे,संतोष गावडे,सचिन मुळीक,रोहन मल्हार,आदी उपस्थित होते.सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर दोन व्हिलचेअर्स उपलब्ध करून दिल्या आहेत.असे सांगून रुपेश राऊळ गरजूंनी लाभ घ्यावा यासाठी सतर्क राहावे असे आवाहन केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.