समुद्रात मिळाल्या कोळ्याच्या 2 नव्या प्रजाती
लाल डोळे, केसांसारखे पाय अन् 3 ओठ
कॅनडानजीक स्थित सालिश सागरात वैज्ञानिकांना सागरी कोळ्याच्या दोन नव्या प्रजाती मिळाल्या आहेत. त्यांचा शोध स्कूबा डायव्हिंगदरम्यान लागला आहे. हे जीव समुद्रात 18 मीटर म्हणजेच 59 फूट खोलवर मिळाले असू यातील एकाचे डोळे लाल आहेत अणि पायांवर केसांसारखे लांब काटे आहेत, तर दुसऱ्याच्या शरीरावर छोटे परजीवी चिकटलेले असतात.
वैज्ञानिकांनी या दोन्ही प्रजातींची नावे कॅलिपॅलेनी पिलोसस्पीडीज आणि टॅनिस्टाइलम किक्सिन ठेवली आहेत. त्यांची रचना आणि शरीराच्या काही खास गोष्टी एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत. या शोधामुळे समुद्रात राहणाऱ्या छोट्या जीवांविषयी नवी माहिती मिळू शकते. या भागात अद्याप अशा अनेक प्रजाती आहेत, ज्याविषयी लोकांना माहिती नाही असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
पहिल्या प्रजातीच्या पायांवर केसांसारखे काटे
पहिल्या प्रजातीचे नाव कॅलिपॅलेनी पिलोसस्पीडीज असून त्याच्या पायांच्या खालच्या भागावर लांब अन् वळलेल्या काट्यासारखे केस आहेत. याचे शरीर पातळ अन् डोळे लाल आहेत. याच्या तोंडानजीक तीन ओठांसारख्या रचना आहेत. याच्या शरीरावर छोटे पंजेही आढळून येतात. या प्रजातीची एक खास बाब म्हणजे याचे पायासारखे दिसणारे अवयव आहेत. याचा वापर चालण्यासाठी होत नाही. हे अवयव शरीर आणि पायांची सफाई करण्यास मदत करतात. वैज्ञानिकांनी मायक्रोस्कोपने पाहिले असता हा जीव या अवयवांना स्वत:च्या पायांच्या चहुबाजूला गुंडाळून घेतो. यावर कंगव्यासारखे छोटे केसे असतात, ज्या माध्यमातून तो स्वत:च्या पायांना साफ करतो.
दुसऱ्या प्रजातीच्या शरीरावर छोटे परजीवी
दुसऱ्या प्रजातीचे नाव टॅनिस्टाइलम किक्सिन असून याचे डोळे काळे असतात आणि शरीराचा मागील हिस्सा घंटेसारखा दिसतो. याचे पंजे छोटे असतात आणि याचे अवयव छोटे असतात. हे अवयव सहजपणे वळू शकत नाहीत. याचमुळे हा स्वत:च्या शरीराची सफाई चांगल्याप्रकारे करू शकत नाही. या प्रजातीच्या शरीरावर छोटे परजीवी चिकटलेले असतात. या प्रजातीच्या नावावर वापरलेला किक्सिन शब्द समुद्राच्या लाटांच्या आवाजाशी संबंधित आहे. हे नाव अशा ठिकाणांनजीक लाटा धडकण्याच्या आवाजाच्या आधारावर ठेवण्यात आले आहे, जेथे पूर्वी एक स्थानिक गाव होते.
सागरी कोळी प्रत्यक्षात कोळी नाहीत
नावात कोळी असल्याने सागरी कोळी प्रत्यक्षात कोळ्यापेक्षा वेगळा असतो. परंतु याचा संबंध कोळी, विंचू आणि हॉर्सशू व्रॅब यासारख्या जीवांशी आहे. याच्या शरीरात चार हिस्से असतात आणि सर्वसाधारणपणे आठ लांब पाय असतात. काही प्रजातींमध्ये पायांची संख्या 12 पर्यंत असू शकते. उथळ पाण्यात राहणारे अनेक सागरी कोळ्यांचे चार डोळे असतात. त्यांचे तोंड अनेकदा याच्या शरीरापेक्षा मोठे असते. हे स्वत:च्या तेंडाने छोट्या सागरी जीवांचा रस शोषून घेत भोजन करतात. याच्या शरीरात भोजन पचविणे आणि प्रजननाशी निगडित अवयय पायांपर्यंत फैलावलेले असतात.