For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद

06:41 AM May 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
दोन नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद
Advertisement

वृत्तसंस्था, रांची

Advertisement

येथे सुरु असलेल्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत दोन नवे राष्ट्रीय विक्रम नोंदविले गेले. पुरषांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत दोन वेळेला यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाला तर महिलांच्या लांब उडी आणि थाळीफेक प्रकारात अॅथलेट्सकडून अव्वल कामगिरी पहायला मिळाली.

या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुरुषांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत रिलायन्सचा धावपटू गुरिंदरविर सिंगने यापूर्वी अनिमेश कुझूरने नोंदविलेला 10.18 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. त्याने उपांत्य फेरीमध्ये 10.17 सेकंदाचा अवधी घेतला. तर त्यानंतर अनिमेशने या स्पर्धेत दुसऱ्या उपांत्य फेरीत 10.15 सेकंदाचा नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. गुरिंदरविर सिंग आणि अनिमेश यांच्यात आता 100 मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये अंतिम फेरीत खरी चुरस पहावयास मिळेल. आगामी राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा 10.16 ही पात्रतेसाठी मर्यादा राहिल.

Advertisement

महिलांच्या लांब उडी प्रकारात शैली सिंग आणि अॅन्सी सोजन यांची कामगिरी दर्जेदार झाली. अॅन्सीने या क्रीडा प्रकारात 6.75 मी. ची नोंद करत यापूर्वी म्हणजे गेल्या वर्षी शैली सिंगने नोंदविलेला 6.64 मी. चा स्पर्धा विक्रम मोडीत काढला. या क्रीडा प्रकारात शैलीने 6.58 मी. ची नोंद करत दुसरे स्थान मिळविले. महिलांच्या थाळीफेकमध्ये सीमाने 57.29 मी. नोंद करत प्रथम स्थान मिळविले. तसेच तिने आगामी राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली.

Advertisement
Tags :

.