For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वारणेत दोन मोटर सायकल मध्ये धडक : एक ठार,एक गंभीर

06:32 PM Dec 15, 2023 IST | Kalyani Amanagi
वारणेत दोन मोटर सायकल मध्ये धडक   एक ठार एक गंभीर
Advertisement

वारणा पेट्रोल पंपाकडे वळताना अपघात

Advertisement

वारणानगर प्रतिनिधी

वाठार बोरपाडळे राज्य मार्गावर वारणानगर ता. पन्हाळा येथील वारणा पेट्रोल पंपाकडे पेट्रोल टाकण्यास वळण घेत असलेल्या यामाह मोटर सायकलला मागून वेगाने येणाऱ्या यामाह मोटर सायकल स्वाराने जोराची धडक दिली. यामध्ये कोडोली ता. पन्हाळा येथील सावित्री बेकरीचे मालक पुरुषोत्तम कृषा चावला (वय ६९) हे जागीच ठार झाले. तर धडक देणारा प्रसन्न शरद पाटील वय १८ रा. आरळे ता. पन्हाळा हा गंभीर जखमी झाला आहे.

Advertisement

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी या आपघातातील दोन्ही यामाह कंपनीच्या स्पोर्टस मोटर सायकल असून दोघेही कोडोलीकडून वारणानगर कडे चालले होते. यातील पुरुषोत्तम चावला पेट्रोल पंपाकडे वळण घेत असताना मागून येणाऱ्या प्रसन्न पाटील याने त्यांना जोराची थडक दिली. या दोघांनाही तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथील खाजगी हॉस्पीटल मध्ये हालवण्यात आले. यामध्ये चावला यांचे उपचारापूर्वीच निधन झाले तर प्रसन्नवर उपचार सुरु आहेत.

शुक्रवार दि. १५ रोजी सकाळी झालेल्या दोन मोटर सायकलच्या आपघातात वाहतुक ठप्प झाली होती. कोडोली पोलीसांना माहिती समजताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आपघातग्रस्त वाहन बाजूला करून जखमीना उपचारास नेलेल्या ठिकाणची माहिती घेतली.

या अपघातातीत मयत आणि जखमींना उपचारासाठी कोल्हापूरात हलवल्याने आपघाता बाबत कोल्हापूर येथील पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. या मध्ये मयत पुरषोत्तम व जखमी प्रसन्न यांच्यावर झालेल्या आघाताने हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.