महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

138 कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन जमा

10:37 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

साहाय्यक अभियंते कलादगी यांची माहिती

Advertisement

बेळगाव : महापालिकेमध्ये 138 सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ही नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे त्यांचे वेतन झाले नव्हते. मात्र बहुतांश कामगारांच्या खात्यामध्ये दोन महिन्यांचे वेतन जमा केल्याची माहिती साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी यांनी दिली. सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती नियमानुसारच केली गेली आहे, असे त्यांनी सांगितले. याबाबत सरकारनेही संबंधितांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घ्यावे, असा आदेश दिला आहे. त्यानुसार त्यांना कामावर नियमित केले जाणार आहे. काही तांत्रिक कारणामुळे 138 कामगारांचे वेतन थकीत होते. त्यानंतर आता दोन महिन्यांचे वेतन जमा करण्यात आले आहे. काही कंत्राटदार वेतन देण्यास टाळाटाळ करत होते. मात्र अखेर त्या कामगारांना रितसर नियुक्त करून त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केल्याचे सांगण्यात आले. या 138 कामगारांना वेतन मिळाल्याने त्यांची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. उर्वरित वेतनही दहा दिवसांत जमा होईल, असे हणमंत कलादगी यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article