महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘मनरेगा’ची दोन महिन्यांची मजुरी थांबली

12:04 PM Jan 17, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :

Advertisement

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे 2024 जिल्ह्यासाठी 4 लाख 30 हजार 482 मनुष्य दिवस इतके लक्ष्य होते. ही उद्दिष्टपूर्ती झाली आहे. 5 लाख 55 हजार 888 इतके मनुष्य दिवस पूर्ण झाले आहेत. उद्दिष्टापेक्षा 1 लाख 25 हजार 406 इतके मनुष्य दिवस अधिकचे झाले आहेत. मात्र दोन महिन्यांची मजुरी थकली आहे. 3 कोटी 17 लाख रुपये थकित मजुरीच्या प्रतीक्षेत मजूर आहेत.

Advertisement

केंद्राकडून कुटुंबाला 100 दिवसाच्या कामाची हमी दिली जाते. राज्य शासनाकडून पूर्ण वर्षभर काम देण्याचे आश्वासन आहे. जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद असल्याचे नरेगाचे गटविकास अधिकारी दिनकर खरात यांनी सांगितले. मनरेगामुळे सार्वजनिक विकासाची कामे होत आहेत. रस्ते, घरे, शोषखडे, फळबागा, रेशीम आदी कामे करण्यात येत आहेत.

फळबागाचे 60 हजार हेक्टर इतके लक्ष्य होते. त्यापैकी 55 हजार हेक्टरवर मनरेगातून फळबाग लागवडीची पूर्ती झाली आहे. 2024-25 मध्ये 4 लाख 30 हजार 482 मनुष्य दिवस इतके लक्ष्य होते.

ही उद्दिष्टपूर्ती झाली असून 5 लाख 55 हजार 888 इतके मनुष्य दिवस पूर्ण झाले आहेत. एका मजुराला सात दिवस काम मिळाले आहे. मात्र दोन महिन्यापासूनची मजुरी थकली आहे.

कुशल मजूर खर्च- 16 कोटी 16 लाख 94 हजार

अकुशल मजूर खर्च - 3 कोटी 22 लाख 68 हजार

आजरा               122.92

गगनबावडा          30.63

भुदरगड            186.93

चंदगड              270.38

गडहिंग्लज         65.39

हातकणंगले       306.3

कागल            293.3

करवीर          114.42

पन्हाळा          73.92

राधानगरी       154.19

शाहूवाडी        40.18

शिरोळ         176.22

एकूण         1834.78

बांधकाम आणि अन्य ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना दिवसाला किमान 500 ते 100 हजार रुपये वेतन मिळते. मनरेगाच्या मजुरांना मात्र आठ तासासाठी 297 रुपये मजुरी दिली जाते. या मजुरीमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे.

मनरेगा योजनेतील मजुरांचे दोन महिन्यांचे 3 कोटी 17 लाख रुपये थकले आहेत. ही मजुरी मिळण्यासाठी मनरेगा नागपूरचे आयुक्त रविंद्र ठाकरे यांना कळवले आहे. त्यांनी आठ दिवसात थकित निधी मिळेल, असे सांगितले आहे.

                                                                         दिनकर खरात, गटविकास अधिकारी, मनरेगा

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article