For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन महिने उलटले तरी कॅन्टोन्मेंटला मासिक बैठकीचा विसर

01:10 PM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
दोन महिने उलटले तरी कॅन्टोन्मेंटला मासिक बैठकीचा विसर
Advertisement

दिरंगाईमुळे अनेक कामे खोळंबली

Advertisement

बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये अनेक समस्या आ वासून उभ्या असताना दोन महिने उलटले तरी अद्याप मासिक बैठक झालेली नाही. नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी कॅन्टोन्मेंटची बैठक होणे गरजेचे आहे. परंतु, या ना त्या कारणाने बैठक रखडली जात असल्याने ही बैठक नेमकी केव्हा होणार? हे पहावे लागणार आहे. महिन्यातून किमान एकदा तरी कॅन्टोन्मेंटची मासिक बैठक व्हावी, असा नियम आहे. सध्या निवडणुका झाल्या नसल्याने अधिकारी व सरकारनियुक्त सदस्यांवरच कॅन्टोन्मेंटचा भार आहे. त्यामुळे नागरिकांच्या कोणत्याही समस्या सोडविण्यासाठी त्यातून तोडगा काढण्यासाठी बोर्ड मिटिंग होणे गरजेचे आहे. यापूर्वीची बोर्ड मिटिंग 6 मार्च रोजी झाली होती. खासदार जगदीश शेट्टर बैठक अर्धवट सोडून निघून गेल्याने चर्चेचा मुद्दा झाला होता. किल्ला येथील फूल मार्केटचा प्रश्न या बैठकीत गाजला होता.

मे महिन्यात तरी मासिक बैठक होणार का?

Advertisement

अनेक नवीन प्रकल्पांना मंजुरी देणे, आहे त्या कामांचा आढावा घेणे, शाळा, हॉस्पिटल, स्वच्छता, नालेसफाई याबाबत निर्णय घेणे यासाठी बोर्ड मिटिंग होणे गरजेचे आहे. परंतु वरिष्ठ अधिकारी उपलब्ध होत नसल्याने बैठकीच्या तारखा पुढे ढकलल्या जात होत्या. मागील बैठक होऊन दोन महिने उलटल्याने मे महिन्यात तरी मासिक बैठक होणार का? याकडे कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.

Advertisement
Tags :

.