For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुचाकी चोरीप्रकरणी दोन अल्पवयीन मुले ताब्यात

07:49 AM Jul 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुचाकी चोरीप्रकरणी  दोन अल्पवयीन मुले ताब्यात
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव

दुचाकी चोरीप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. उद्यमबाग पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून सुमारे 65 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

Advertisement

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. उद्यमबागचे पोलीस निरीक्षक महांतेश होसपेटी, उपनिरीक्षक यु. बी. कट्टीकर, प्रवीण बिरादार व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

22 जुलै रोजी गुरुप्रसादनगर येथील नागराज रामचंद्र आचारी यांनी उद्यमबाग पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. 17 जुलै रोजी केए 05 ईडब्ल्यू 5831 क्रमांकाची दुचाकीची चोरी झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले होते. या प्रकरणाचा तपास करताना दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याजवळून गुरुप्रसादनगर येथून चोरीस गेलेल्या दुचाकीसह केए 24 एस 2395 क्रमांकाची आणखी एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.