महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केरळ सरकारमधील दोन मंत्र्यांचा राजीनामा

06:02 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पिनराई विजयन यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

केरळच्या डाव्या लोकशाही आघाडी (एलडीएफ) सरकारने मंत्रिमंडळात फेरबदलाची घोषणा केली आहे. याअंतर्गत दोन मंत्र्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. रविवारी सरकारने मित्रपक्षांशी केलेल्या निवडणूक करारानुसार हा निर्णय घेतल्याचे सांगितले. अँटोनी राजू आणि अहमद देवरकोविल यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दोघांचेही राजीनामे स्वीकारले आहेत. आता त्यांच्या जागी 29 डिसेंबर रोजी के. बी गणेश कुमार आणि रामचंद्रन कडनापल्ली हे दोघेजण मंत्रिपद स्वीकारतील. 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विजयन सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर सरकारमधील दोन एलडीएफ मंत्री राजीनामा देतील, असे निश्चित करण्यात आले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article