For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअर मार्केटच्या नावाखाली दोन लाखांचा गंडा

06:22 AM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेअर मार्केटच्या नावाखाली  दोन लाखांचा गंडा
Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास अधिक लाभ मिळवून देण्याच्या अमिषाने व्यंकटेशनगर मुतगा येथील एका राजकुमार नामक इसमाला भामट्यांनी 2 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. या प्रकरणी सोमवार दि. 26 रोजी शहर सीईएन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीला 1 जुलै रोजी एका अनोळखी व्यक्तीने व्हॉटस्अॅपवर कॉल केला. शेअर मार्केट आणि गुंतवणुकीसंदर्भात माहिती सांगितली. फिर्यादीला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास अधिक लाभ मिळवून देतो असे सांगून व्हॉटस्अॅपवर मेसेज करत अमिष दाखविले. समोरील व्यक्तीवर विश्वास ठेवून व्हॉटस्अॅपवर पाठविलेल्या एचडीएफसी बँक खात्यावर फिर्यादीने विश्वास ठेवून एनईएफटीच्या माध्यमातून 2 लाख रुपये पाठविले. त्यानंतर समोरील व्यक्तीला व्हॉटस्अॅपवर कॉल केला असता कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने सायबर सहाय्यवाणी 1930 वर संपर्क साधून तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणी बेळगाव शहर सायबर पोलीस स्थानकात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.