For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कांचन कुमारी हत्येतील दोन मारेकऱ्यांना अटक

06:39 AM Jun 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
कांचन कुमारी हत्येतील दोन मारेकऱ्यांना अटक
Advertisement

हत्येचा सूत्रधार अमृतपाल अद्यापही मोकाट

Advertisement

वृत्तसंस्था/ लुधियाना, बठिंडा

सोशल मीडिया एन्फ्लुएंसर कांचन कुमारी उर्फ कमल कौर भाभी हिच्या हत्येप्रकरणी भटिंडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींची ओळख जसप्रीत सिंग मेहरू आणि तनिमनरजीत सिंग अशी झाली आहे. आरोपींनी चौकशीदरम्यान हत्या प्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या हत्येचा सूत्रधार अमृतपाल याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असे एसएसपी अमनीत कौंडल यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

Advertisement

कांचन कुमारी हिच्या हत्येप्रकरणी शहर पोलीस अधीक्षक नरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली हत्या प्रकरण उलगडण्यासाठी एक पथक तयार करण्यात आल्याचे एसएसपी कौंडल यांनी स्पष्ट केले. काही महिन्यांपूर्वी एका विदेशी गँगस्टरने सोशल मीडियावरील कांचन कुमारीच्या कंटेंटवरून टीका केली होती. पोलीस आता याप्रकरणी हा पैलू विचारात घेत तपास करत आहेत. तसेच मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात कॅनडातील दहशतवादी अर्श दल्लाने कंचन कुमारीला कथित स्वरुपात अश्लील व्हिडिओ पोस्ट करणे बंद करण्याची धमकी दिली होती. तर मृतदेह हस्तगत झालेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. संबंधित भागातील सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले जात आहे.

कांचन कुमारी इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘कमल कौर भाभी’ या नावाने सक्रीय होती. ती लुधियानाच्या लछमन कॉलनीत राहत होती. तिच्या इन्स्टाग्राम अकौंटवर 3.83 लाख फॉलोअर्स आहेत. कांचन कुमारी ही 9 जून रोजी भटिंडा येथे एका प्रमोशनल कार्यक्रमात सामील होण्यासाठी घरातून बाहेर पडली होती, त्यानंतर तिचा कुटुंबियांशी संपर्क झाला नव्हता. बुधवारी रात्री रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी येऊ लागल्यावर लोकांनी पोलिसांना कळविले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना मागील सीटवर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कांचन कुमारीचा असल्याचे स्पष्ट झाल्यावर तिच्या कुटुंबियांना कळविण्यात आले होते.

Advertisement
Tags :

.