For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अतिवेगाने दोघे जागीच ठार

01:20 PM Mar 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
अतिवेगाने दोघे जागीच ठार
Advertisement

दोघेही झुआरीनगरातील : कुयेलीजवळील अपघात

Advertisement

वास्को  : वेलसांवहून कुयेली गावाकडे जाणाऱ्या अंतर्गत अरूंद रस्त्यावर काल रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दोघे युवक जागीच ठार झाले. दुचाकीचालकाच्या भरधाव वेगामुळे हा अपघात घडला. मूळ कर्नाटकी असलेले हे मयत युवक झुआरीनगरातील राहणारे होते. व्यंकटेश बसरी (24 वर्षे) व राकेश संकप्पनावर (26 वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. उपलब्ध माहितीनुसार हा अपघात क्वीनीनगर नाक्यापासून जवळपास अडीच किलोमीटर अंतरावरील आदोळे या गावातील अंतर्गत रस्त्यावर संध्याकाळी सहाच्या सुमारास घडला. मडगावला जाण्या-येण्यासाठी शॉर्टकट असल्याने या मार्गाचा हल्ली वापर होऊ लागलेला आहे.

वेलसांव येथून या मार्गाची सुरूवात होते. मयत युवक याच मार्गाने आपल्या स्कूटरवरून क्वीनीनगर झुआरीनगरच्या दिशेने येत होते. एक इनोव्हा पर्यटक कार याच मार्गाने मडगावच्या दिशेने जात होती. या मार्गावरील आदोळे या गावात स्कूटरची कारला जबरदस्त धडक बसली. मयत व्यंकटेश हा स्कूटर चालवत होता. या स्कूटरचालकाने भरधाव वेगाने कारला धडक दिल्याची चर्चा घटनास्थळी हेती. या जबरदस्त धडकेमुळे एकटा त्या कारखाली चिरडला तर दुसरा काही अंतरावर फेकला गेला. जागीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यावर हेल्मेटही नव्हते.

Advertisement

वेग मर्यादा पाळा : आमदार वास

या अपघाताची माहिती मिळताच कुठ्ठाळीचे आमदार अँथनी वास यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. अतिवेगामुळे हा अपघातात घडल्याचे सांगून त्यांनी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन केले. महामार्ग व गावाना जोडलेला हा रस्ता अरूंद आहे. हा रस्ता खराब होता. हल्लीच या रस्त्याचे डांबरीकरण करून सुरळीत करण्यात आलेला आहे. मात्र, रस्ता चांगला झाला म्हणून चालकांनी वेगमर्यादा ओलांडून अपघातांना आमंत्रण देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

Advertisement
Tags :

.