कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माणमध्ये दोन अपघातात दोघांचा मृत्यू

05:25 PM Jun 06, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

दहिवडी :

Advertisement

मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात माण तालुक्यातील परतवडी येथील महेश बाळू मोहिते (वय 32) हा आयटी इंजिनियर ठार झाला. त्याचबरोबर बिदाल-दहिवडी रस्त्यावर दुचाकीचा टायर फुटून झालेल्या अपघातात शालेय विद्यार्थी तथा ग्रामीण रिल्सस्टार म्हणून परिसरात नावलौकिक असलेला विराज उर्फ गणेश जगदाळे (वय 16) हा ठार झाला.

Advertisement

महेश मोहिते हा आपल्या कुटुंबियांसह कळंबोली (नवी मुंबई) येथे कामानिमित्त राहतो. गावी परतवडी येथे सुरू असलेल्या घराच्या बांधकामासाठी तो दहिवडी येथे राहत होता. दहिवडी येथून येऊन जाऊन तो घराच्या बांधकामाकडे लक्ष देत होता. बुधवारी दिवसभर परतवडी येथे थांबून सायंकाळी तो आपल्या बुलेट मोटारसायकलवरुन दहिवडीला निघाला होता. तर मार्डी (ता. माण) येथील निलेशकुमार हणमंत राऊत (वय 35) हे आपला मुलगा केदार (वय 4) यांच्यासह स्प्लेंडर या मोटारसायकलवरुन मलवडीला पाहुण्याकडे निघाले होते.
साधारण सव्वा सहाच्या सुमारास मलवडी - दहिवडी रस्त्यावर बिदालनजीक नांगरे गोठा येथील उतारावर या दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. या धडकेत महेश मोहिते याचा जागीच मृत्यू झाला. तर निलेशकुमार राऊत याचा डावा पाय फ्रॅक्चर झाला व डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. सुदैवाने चार वर्षांच्या केदारला गंभीर दुखापत झाली नाही.

सर्वांसोबत प्रेमाने वागणाऱ्या मनमिळाऊ महेशच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. महेश हा उच्चशिक्षित असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक लहान मुलगा, दोन बहिणी असा परिवार आहे.

माण तालुक्यातील बिदाल गावचा उद्योन्मुख हरहुन्नरी कलाकार विराज ऊर्फ गणेश युवराज जगदाळे (वय 16) याचा अपघाती मृत्यू झाला. मोटारसायकलचा टायर फुटल्याने झालेल्या या अपघाताने बिदाल गावावर शोककळा पसरली आहे.

विराज हा गुरूवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत मोटारसायकलवरुन दहिवडीला निघाला होता. बिदाल ते दहिवडी रस्त्यावरील बिदाल हद्दीतील सावता माळी वस्ती नजीक मोटारसायकल आली असता अचानक गाडीचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. त्यातच मोटारसायकलवर पाठीमागे बसलेला विराज हा डांबरी रस्त्यावर पडला. यामुळे विराजच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ दहिवडी येथे हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

इयत्ता दहावीत गेलेल्या विराजने कमी वयात अनेक कलांमध्ये प्राविण्य मिळवले होते. अतीशय गरीब घरातील विराज चांगली कुस्ती खेळत होता. ग्रामीण रिलस्टार म्हणून तो नावारुपाला आला होता. शाळेत सर्व खेळांमध्ये हिरीरीने भाग घेताना तो अभ्यासात कमी नव्हता. मुक्या प्राण्यांवर प्रेम करणारा, म्होरकी, वेसण यासोबतच बिदालचे वैशिष्ट्या असलेले बैलाची तोरण बनविण्यात माहीर असणारा विराजचा अचानक मृत्यू झाल्याने बिदालकर सुन्न झाले. विराजच्या अकाली जाण्याने त्याचे आईवडील व बहिणीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे...

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article