For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धारबांदोड्यात दोन अपघातांमध्ये दोघे ठार

02:50 PM Jun 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
धारबांदोड्यात दोन अपघातांमध्ये दोघे ठार
Advertisement

अनमोड घाटात ट्रक दरीत कोसळला

Advertisement

फोंडा / धारबांदोडा : धारबांदोडा तालुक्यात फोंडा व कुळे पोलिसस्थानकाच्या हद्दीत  काल रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही अपघात फोंडा-बेळगाव महामार्गावर घडले आहेत. अनमोड घाटात रेतीवाहू टिप्पर ट्रक दरीत कोसळल्याने चालक ठार झाला. तर सकाळी 9.30 वा. झालेल्या दुसऱ्या अपघातात धारबांदोडा पेट्रालपंपजवळ दोन दुचाक्यांची टक्कर होऊन त्यात विजय चव्हाण (69, रा. पणसुले-धारबांदोडा) या दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. विजय चव्हाण हा जीए 12 बी 1049 या स्कूटरवऊन दूध आणण्यासाठी पणसुले येथून धारबांदोडा पंचायतीजवळ गेला होता.

पेट्रोल भरण्यासाठी त्याने आपली दुचाकी पेट्रालपंपच्या दिशेने वळवली असता, फोंड्याहून मोलेच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या जीए 07 एएम 1472 या मोटरबाईकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात विजय हा दुचाकीसह रस्त्यावर कोसळल्याने गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने प्रथम पिळये आरोग्य केंद्रात व नंतर फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले असता तेथील डॉक्टरनी मृत घोषित केले. या अपघातातील मोटरबाईकस्वार निखिल नाईक (रा. डोंगरी) हाही जखमी झाला. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. या घटनेनंतर काहीवेळाने तेथून निघालेले सभापती गणेश गावकर यांनी तेथे थांबून अपघाताविषयी माहिती कऊन घेतली.

Advertisement

अनमोड घाटात ट्रक दरीत कोसळला

दुसरा अपघात शनिवारी मध्यरात्री घडला. कर्नाटकातून अनमोड घाटमार्गे गोव्याकडे वाळू घेऊन येणारा टिप्पर ट्रक घाटातील एका धोकादायक वळणावऊन बाजूच्या खोल दरीत कोसळला. त्यात ट्रकचालक तपश मिस्त्री (33, मूळ पश्चिम बंगाल) याचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या बाजूचा संरक्षक कठडा तोडून साधारण पन्नास मीटर खोल दरीत हा ट्रक कोसळला होता. हा अपघात एवढा भीषण होता की, खाली कोसळताना ट्रकचे एक चाक तुटून बाजूला पडले. तसेच केबिनच्या भागाचा चक्काचूर झाला. फोंडा अग्निशामक दलाच्या मदत पथकाने बऱ्याच प्रयत्नांनी केबिनचा पत्रा कापून चालकाचा मृतदेह बाहेर काढला. कुळे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.

Advertisement
Tags :

.