For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Accident | ट्रकच्या धडकेत हत्तूरजवळ दोघे ठार

11:15 AM Jun 03, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
solapur accident   ट्रकच्या धडकेत हत्तूरजवळ दोघे ठार
Advertisement
विजयपूर महामार्गावरील हत्तूरजवळ ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू
सोलापूर : विजयपूर महामार्गावरील हत्तूरजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात २ जून रोजी पहाटे तीनच्या सुमारास झाला. रहेमान मौला ढवळगी (वय ४८) आणि राजू इमामसाब शेख (वय ३५, दोघे रा. सलगार वस्ती) अशी त्यांची नावे आहेत. १ जून रोजी मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते तिघे एका हॉटेलात गेले होते.
वाढदिवस संपवून पहाटे तीनच्या सुमारास ढवळगी व शेख हे दोघे एका दुचाकीवरून सलगार वस्तीमधील घराकडे येण्यास निघाले होते. त्यावेळी हत्तूरजवळील ब्रिजच्या अलीकडे एमएच १३ एपी २३४० या क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील ढवळगी व शेख हे दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ढवळगी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉ. स्नेहा साळुंखे यांनी घोषित केले. तर राजू शेख याचा उपचारावेळी मृत्यू झाला. याबाबत सिव्हिल पोलीस चौकीत नोंद केली आहे.
Advertisement
Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.