चिक्कबागेवाडीनजीक कार अपघातात दोघांचा बळी
12:53 PM Nov 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
रस्त्याशेजारील खांबाला कारची ठोकर
Advertisement
बेळगाव : रस्त्याशेजारील खांबाला ठोकरून कार उलटल्याने दोघेजण ठार झाले. बुधवारी सायंकाळी चिक्कबागेवाडीजवळ ही घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत यासंबंधी अधिक तपशील उपलब्ध झाला नाही. चिक्कबागेवाडीहून बैलहोंगलकडे जाताना ही घटना घडली आहे. रस्त्याशेजारच्या खांबाला ठोकरून कार उलटली आहे. घटनेची माहिती समजताच बैलहोंगल पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कारमधील एक जण जागीच ठार झाला होता तर आणखी एकाला इस्पितळात हलविण्यात आले होते. मात्र, रात्री उपलब्ध झालेल्या माहितीनुसार दोघा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. बैलहोंगलचे पोलीस निरीक्षक प्रमोद यलीगार, उपनिरीक्षक गुरुराज कलबुर्गी आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Advertisement
Advertisement