For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शस्त्रास्त्र दुरुस्तीवेळी दोन जवानांचा मृत्यू

06:04 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
शस्त्रास्त्र दुरुस्तीवेळी दोन जवानांचा मृत्यू
Advertisement

लडाखमध्ये लष्करी उपकरणे दुऊस्त करताना अपघात

Advertisement

वृत्तसंस्था/ लेह

लडाखमध्ये लष्करी उपकरणे दुरुस्त करताना दोन लष्करी जवानांचा मृत्यू झाला. शस्त्र विभागात काम करणारे कारागीर हवालदार गोट्टापू शंकर राव आणि हवालदार शाहनवाज भट हे शस्त्रास्त्र दुरुस्तीवेळी झालेल्या स्फोटामुळे गंभीर जखमी झाले होते. दोघाही जखमींना तातडीने लेहमधील इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. लष्करी विभागाकडून या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत

Advertisement

Advertisement
Tags :

.