For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जपानी नौदलाची दोन हेलिकॉप्टर्स कोसळली

06:45 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
जपानी नौदलाची दोन हेलिकॉप्टर्स कोसळली
Advertisement

एकाचा मृत्यू, 7 बेपत्ता

Advertisement

टोकियो

जपानी नौदलाची दोन हेलिकॉप्टर्स टोकियोच्या दक्षिणेस प्रशांत महासागरात कोसळली असून या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण बेपत्ता झाले आहेत. देशाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी यासंबंधी माहिती दिली आहे. प्रशिक्षणादरम्यान ही हेलिकॉप्टर्स परस्परांना धडकली असावीत अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सागरी आत्मरक्षा दलाचे दोन एसएच-60 के हेलिकॉप्टर्समध्ये चालक दलाचे प्रत्येकी 4 सदस्य सवार होते. शनिवारी रात्री उशिरा तोरीशिमा बेटानजीक त्यांचा संपर्क तुटला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.