For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

या आठवड्यात 2 आयपीओ होणार खुले

06:13 AM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
या आठवड्यात 2 आयपीओ होणार खुले
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

6 एप्रिलपासून सुरू झालेल्या आठवड्यात दोन नवे आयपीओ खुले होणार आहेत. यामध्ये एक आयपीओ मेन बोर्डावरती खुला होणार आहे सेफ्टी कंट्रोल्स अँड डिव्हायसेस यांचा आयपीओ सोमवारी खुला झाला असून 8 एप्रिलपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. कंपनी आयपीओअंतर्गत 48 कोटी रुपयांची उभारणी करणार असून इशू किंमत 75-80 रुपये प्रति समभाग अशी ठेवण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 1600 समभागांचा समावेश आहे. बी एसई एसएमई वर कंपनीचे समभाग 13 एप्रिल रोजी सूचीबद्ध होऊ शकतात.

प्रॉपशेअर सेलेस्टीयाचा 244 कोटीचा आयपीओ

Advertisement

प्रॉपशेअर सेलेस्टीया यांचाआयपीओ 244 कोटी रुपयांचा असणार आहे. सदरचा आयपीओ 10 एप्रिल रोजी खुला होऊन 16 एप्रिल रोजी बंद होणार आहे. कंपनीचा समभाग 24 एप्रिल रोजी बीएसईवर सूचिबद्ध होऊ शकतो.

हा आयपीओ उद्या बंद

इमीयाक टेक्नॉलॉजी यांचा आयपीओ 27 मार्च रोजी खुला झाला होता आणि 8 एप्रिल रोजी बंद होणार आहे. आयपीओला आत्तापर्यंत 35 टक्के सबक्रिप्शन प्राप्त झाले आहे. आयपीओअंतर्गत 31.75 कोटी रुपये उभारण्यात येणार असून 93 ते 98 रुपये प्रति समभाग अशी इशू किंमत निश्चित करण्यात आली आहे. 13 एप्रिल रोजी समभाग बीएसई एसएमईवरती सूचीबद्ध होऊ शकतो.

Advertisement
Tags :

.