For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

नेपाळमध्ये लॅँडिंगदरम्यान दोन हेलिकॉप्टरची टक्कर

06:39 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेपाळमध्ये लॅँडिंगदरम्यान दोन हेलिकॉप्टरची टक्कर
Advertisement

भारतीय पर्यटकाचा मृत्यू : दोन्ही वैमानिक जखमी

Advertisement

वृत्तसंस्था, काठमांडू

नेपाळच्या एव्हरेस्ट क्षेत्रातील सोलुखुम्बू जिह्यात मंगळवारी सकाळी लँडिंगचाप्रयत्न करताना दोन हेलिकॉप्टरची टक्कर झाली. या अपघातात एका भारतीय पर्यटकाचा मृत्यू झाला, तर न्यूझीलंडचा भारतीय वंशाचा नागरिक आणि दोन्ही हेलिकॉप्टरचे पायलट जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही हेलिकॉप्टरचे रोटर ब्लेड एकमेकांना धडकले.

Advertisement

सकाळी 8.11 वाजता फेरीचे हेलीपॅडवर हा अपघात झाला. फिशटेल एअर आणि एअर डायनेस्टी या कंपन्यांची हेलिकॉप्टर तेथे उतरण्याचा प्रयत्न करत होती. फिशटेल एअरच्या हेलिकॉप्टरमधील भारतीय पर्यटक वसंत कुमार बालारामारामाडू यांचा मृत्यू झाला. त्याच हेलिकॉप्टरमधील न्यूझीलंडचे नागरिक शैलेश कृष्ण पटेल जखमी झाले.

एकाच हेलीपॅडवर उतरण्याचा प्रयत्न

नेपाळी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एक हेलिकॉप्टर लुक्लाहून येत होते, तर दुसरे एव्हरेस्ट बेस पॅम्पजवळील गोरक्षेपकडून परतत होते. दोन्ही हेलिकॉप्टर वेगवेगळ्या दिशांनी एकाच ठिकाणी उतरण्याचा प्रयत्न करत असताना ही टक्कर झाली. हेलीपॅडवर बर्फ साचल्यामुळेही परिस्थिती निर्माण झाली असण्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे; मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही.

जखमीला काठमांडूला हलवले

शैलेश पटेल यांना यअन् हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून काठमांडूतील मेडिसिटी ऊग्णालयात दाखल करण्यात आले. मृत पर्यटकाचा मृतदेह लुक्ला येथील ऊग्णालयात नेण्यात आला. दोन्ही पायलट जखमी झाल्याचेही प्राथमिक वृत्त आहे. अपघाताच्या वेळी दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये एकूण किती जण होते, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

फेरीचे हेलीपॅडचे महत्त्व

फेरीचे हेलीपॅड समुद्रसपाटीपासून सुमारे 4,371 मीटर उंचीवर आहे. एव्हरेस्ट परिसरातील हेलिकॉप्टर सेवांसाठी हे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. गिर्यारोहक आणि टेकिंगसाठी आलेल्या पर्यटकांना मदत पोहोचवणे, उंचीमुळे प्रकृती बिघडलेल्या किंवा अपघातात जखमी झालेल्यांना ऊग्णालयात हलवणे यासाठी येथून हेलिकॉप्टर सेवा वापरल्या जातात.

Advertisement
Tags :

.