For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यल्लापूर-सिरसीत वनविभागाची धडक कारवाई; शिकारीच्या संशयावरून दोघे अटकेत

01:21 PM Sep 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
यल्लापूर सिरसीत वनविभागाची धडक कारवाई  शिकारीच्या संशयावरून दोघे अटकेत
Advertisement

यल्लापूर-सिरसी : गोवा आणि उत्तर कन्नडच्या जंगल परिसरात वन्यजीवांची शिकार करणाऱ्या कथित टोळीविरोधात वनविभागाने कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे. यल्लापूर-सिरसी परिसरात वनविभागाच्या मोबाईल पथकाने ही कारवाई केली.

Advertisement

कारवाईदरम्यान संशयितांकडून मोठ्या प्रमाणात वन्यजीवांशी संबंधित अवैध साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले दोघेही गोवा तसेच उत्तर कन्नड जिल्ह्यातील जंगलांमध्ये वन्यजीवांची शिकार करणाऱ्या टोळीशी संबंधित असल्याचा संशय वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

वनविभागाच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे यल्लापूर-सिरसी परिसरात शोधमोहीम राबवली. त्यानंतर संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील साहित्याची तपासणी करण्यात आली. या कारवाईत वन्यजीव शिकारीशी संबंधित साहित्य आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement

अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, गोवा आणि उत्तर कन्नडमधील वन्यजीव शिकारीच्या घटनांशी त्यांचा संबंध आहे का, याचा तपास वनविभागाकडून केला जात आहे. या टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेण्यासाठीही तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे.

या कारवाईमुळे गोवा-कर्नाटक सीमावर्ती जंगलांमध्ये सुरू असलेल्या कथित वन्यजीव शिकारीविरोधात वनविभागाने कठोर पावले उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Tags :

.