कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur Politics : कागल पालिका निवडणुकीत दोन कट्टर गट एकत्र; मंत्री मुश्रीफांचे कार्यकर्त्यांना आवाहन

05:13 PM Nov 26, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                                       राष्ट्रवादी–शाहू आघाडीची कागलमध्ये एकजूट

Advertisement

कागल : एका ऐतिहासिक वळणावर कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत कट्टर विरोधक आसलेले दोन प्रबळ गट एकत्र आले आहेत म्हणून कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत गाफील राहू नये, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

Advertisement

कागल पालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि छत्रपती शाहू आघाडीच्या प्रभाग १ आणि २ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ शाहू कॉ लनी, जयसिंगराव पार्क येथे झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, गेल्या नऊ वर्षात पालिका निवडणुकीची तयारी केलेल्या दोन्ही बाजूच्या इच्छुकांना माघार घ्यावी लागल्यामुळे अन्याय झाला. त्यांचा त्याग विसरणार नाही. योग्यवेळी त्यांचा सन्मान करू. कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षपदासह नगरसेवक उच्चांकी मतांनी निवडून येतील, यासाठी काम करावे.

शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, १० वर्ष दोन्ही गटांनी शहराच्या विकासाची स्पर्धा केली. आता एकत्र आल्यामुळे संघर्षातील ताकद शहराच्या विकासासाठी वापरू. विकासाच्या मुद्यावरच आम्ही एकत्र आलो आहोत.

नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सविता माने म्हणाल्या, मंत्री मुश्रीफ आणि राजे समरजितसिंह घाटगे एकत्र आले आहेत. या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून कागलमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. काही अपूर्ण कामे या नेत्यांच्या ताकदीवर पूर्ण करू, असे सांगितले.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, उमेदवार सुशांत कालेकर, मेघा माने, अमित पिष्ट, साधना पाटील यांच्यासह विजय काळे, संग्राम गुरव, गुणाजी भोसले, योगेश कदम, संजय चितारी, शशिकांत नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, कागलमध्ये उमेदवारांच्या विरोधात आमच्या हमीदवाडा कारखान्याचे बरेचसे कर्मचारी निवडणूक लढवत आहेत. यापैकी काही कामगारांना विरोधकांनी सहलीवर नेले आहे. स्वतःच्याच कारखान्याच्या परमनंट कामगारांना कोणी सहलीवर घेऊन जाईल काय? असा उपरोधिक प्रश्न त्यांनी केला

Advertisement
Tags :
#DevelopmentAgenda#Election2025#hasanmushrif#KagalPolitics#MunicipalElection#PoliticalAlliance#ShahuAghadi#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaKagal Municipal Electionmaharashtrapolitics
Next Article