महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडीत विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान राडा

11:22 AM Oct 18, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

दोघा विद्यार्थ्यांना फेकले मोती तलावात ; रात्रीची घटना

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी शहरात मंगळवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान राडा झाला.यात चक्क दोघा विद्यार्थ्यांना मोती तलावात फेकून देण्यात आले .नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने हे दोघे विद्यार्थी सुदैवाने बचावले. काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे विद्यार्थी जवळच असलेल्या एका गावात शिक्षण घेत आहेत. ते मंगळवारी सावंतवाडी शहरात आले होते. मात्र त्यांच्यात ज्युनियर -सिनियर वरून वाद सुरू होता. सावंतवाडी मोती तलावाच्या राजवाडा समोरील काठावर हे विद्यार्थी आले असता त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन जोरदार राडा झाला. त्यात दोघा विद्यार्थ्यांना मोती तलावाच्या पाण्यात फेकून देण्यात आले. यासंदर्भातील माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले .तर त्यांचे सहकारी पळून जाण्यात यशस्वी ठरले. दरम्यान सबंधित कॉलेजच्या प्रमुखांनी घटना कळताच सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Advertisement
Tags :
# tarun bharat news# sawantwadi # moti lake# rada#
Next Article