महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भीषण अपघात दोघे चालक ठार

12:34 PM Nov 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बसमधील महिला गंभीर जखमी : सुदैवाने सातजण बचावले,बरकटे-मोले येथील दुर्घटना

Advertisement

धारबांदोडा : बरकटे-मोले येथे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वॉल्वो बसने समोऊन येणाऱ्या कंटेनर ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बसचालक व ट्रकचालक दोघेही जागीच ठार झाले. बसमधील एक प्रवासी महिला गंभीर जखमी झाली आहे. काल रविवारी रात्री मोले येथील बायोडायव्हर्सिटी पार्कजवळ हा अपघात झाला. या अपघातात अन्य एका फॉर्च्युनर कारलाही धडक लागली असून त्यातील प्रवाशांनाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत. भीमा नाईक व जमाल ख्वाजा अशी मयत वाहनचालकांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार शांता ट्रॅव्हल्स कंपनीची दोन माळे असलेली जीए 07 टी 0548 या क्रमांकाची ही स्लीपर वॉल्वो बस फोंडामार्गे मोले अनमोडहून बेंगळूरकडे निघाली होती. भरधाव वेगात असलेल्या या बसने बरकटे मोले येथील उतरणीवर समोऊन येणाऱ्या केए 63 ए 3760 या क्रमांकाच्या कंटेनर ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती, की ट्रकच्या केबिनचा चक्काचूर होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement

सातजण सुदैवाने बचावले 

याचवेळी ट्रकच्या पाठीमागून येणाऱ्या जीए 03 एटी 0027 या फॉर्च्युनर गाडीला दोनपैकी एका वाहनाची ठोकर लागली. त्यातून प्रवास करणाऱ्या सातजणांना सुदैवाने किरकोळ दुखापत झाली.

बसचालकाचाही मृत्यू 

कंटेनर ट्रकला धडक दिल्यानंतर बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. बसचा केबिनकडील भाग चेपला गेल्याने त्यात बसचालक गंभीर जखमी अवस्थेत अडकून पडला.तसेच बसमधील एका प्रवासी महिलेच्या पाठीत लोखंडी रॉड घुसल्याने तिही गंभीर जखमी झाली. या दोन्ही जखमींना फोंडा अग्निशामक दलाच्या पथकाने साधारण दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढून इस्पितळात दाखल करण्यात आले. इस्पितळात उपचार घेत असलेल्या बसचालकाचाही रात्री उशिरा मृत्यू झाला. वॉल्वो बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे या अपघातातून सुखऊप बचावलेल्या काही प्रवाशांनी सांगितले. कुळे पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत घटनेचा पंचनामा सुऊ होता. घटनास्थळावर नेटवर्क नसल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article