For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वेच्या इमर्जन्सी ब्रेकच्या धक्क्यामुळे दोघांचा मृत्यू

06:08 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
रेल्वेच्या इमर्जन्सी ब्रेकच्या धक्क्यामुळे दोघांचा मृत्यू
Advertisement

ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे अचानक ब्रेक

Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

झारखंडहून दिल्लीला जाणाऱ्या टेनच्या इंजिनचालकाने अचानक ब्र्रेक लावल्यामुळे टेनला अचानक धक्का बसला. या धक्क्यामुळे दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. गोमो आणि कोडरमा रेल्वेस्थानकादरम्यान परसाबादजवळ रविवार, 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.05 वाजता हा अपघात झाला. झारखंडच्या कोडरमा जिल्ह्यात तुटलेल्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरमुळे दिल्लीला जाणारी टेन अचानक थांबवावी लागल्यामुळे ही जीवितहानी झाल्याची माहिती पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. कोडरमा-गोमो सेक्शनमध्ये झालेल्या अपघातानंतर चार तासांहून अधिक काळ वाहतूक खोळंबली होती.

Advertisement

ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित होताच चालकाने पुरी-नवी दिल्ली पुऊषोत्तम एक्स्प्रेसचा आपत्कालीन ब्र्रेक लावत टेन थांबवली. अपघाताच्या वेळी टेन ताशी 130 किमी वेगाने धावत होती, अशी माहिती धनबाद रेल्वे विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक अमरेश कुमार यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच धनबाद रेल्वे विभागाचे व्यवस्थापक के. के. सिन्हा हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले होते. याचदरम्यान घटनास्थळावरून पुऊषोत्तम एक्स्प्रेसला डिझेल इंजिनने गोमो येथे आणण्यात आले. नंतर इलेक्ट्रिक इंजिनने दिल्लीला पाठवण्यात आले. ओव्हरहेड वायर दुरुस्तीनंतर ईसीआरच्या धनबाद रेल्वे विभागांतर्गत ग्रँड कॉर्ड लाईनवर गाड्यांची वाहतूक पुन्हा सुरू झाली.

Advertisement
Tags :

.