Radhanagari moonsson | राधानगरी परिसरात पावसाचे जोरदार पुनरागमन; शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण!
राधानगरी -अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर राधानगरी परिसरासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि तालुक्याच्या पश्चिम भागात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. राधानगरी धरणाची सध्याची पाणी पातळी २९०.५२ फूट इतकी असून धरणातील पाणीसाठा १८२८.८९ दशलक्ष घनफूट (१.८३ टीएमसी) इतका झाला आहे. धरणातून सध्या ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
राधानगरी परिसरात आजदिवसभरात २८ मिमी पावसाचीनोंद झाली असून आतापर्यंत एकूण६८ मिमी पाऊस नोंदविण्यात आलाआहे.मागील काही दिवसांपासूनपावसाने दडी मारल्यानेखरीप हंगामातील पिकांच्याबाढीबाबत शेतकरी चिंतेत होते. मात्र, आता झालेल्या समाधानकारक पावसामुळेपिकांना मोठा आधार मिळालाआहे. सध्या सुरू असलेला पाऊस ऊस, भात तसेच इतर खरीपपिकांसाठी लाभदायक ठरत असून शेतीच्या कामांना वेग आला आहे.पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकरीवर्गामध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.