खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी
मयुर चराटकर
बांदा
सावंतवाडी वनपरिक्षेत्राच्या टीम कडून काल बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातून पकडण्यात आलेल्या दोन आरोपींना खवले मांजराच्या खावल्यांची तस्करी करून व्यवहार करत असताना ताब्यात घेण्यात आले होते. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आरोपी क्र.१- नारायण सावळाराम नाईक, वय-48 वर्षे, आरोपी क्र.2- सद्गुरू मारुती नाईक, वय-52 वर्षे अशी आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून अंदाजे 2 किलो वजनाचे खवले मांजराचे खवले व एक दुचाकी (अंदाजे रक्कम-50 हजार रु.) हस्तगत करण्यात आली. सदरच्या अटक आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम-1972 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर आरोपींना आज सावंतवाडी कोर्टमध्ये हजर केले असता मा.न्यायालयाने अटक आरोपींना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली. या मध्ये न्यायालयाने सदरचा वन गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मत निंदविले. न्यायालयामध्ये वन विभागाची बाजू सक्षमपणे वनक्षेत्रपाल सावंतवाडी मदन क्षीरसागर यांनी मांडली. आरोपीच्या बाजूने ऍडव्होकेट श्री. परिमल नाईक यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. ही कोर्टकेस कारवाई सावंतवाडी उपवनसंरक्षक श्री.एस नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक श्री.सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल प्रमोद सावंत, प्रमोद राणे, वनरक्षक महादेव गेजगे, सागर भोजने, संग्राम पाटील यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.