For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Radhanagari News | राधानगरी तालुक्यात सलग दोन घरफोड्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

02:11 PM Feb 18, 2026 IST | NEETA POTDAR
radhanagari news   राधानगरी तालुक्यात सलग दोन घरफोड्या  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Advertisement

                                    आकनूर येथे चोरट्यांचा धुमाकूळ

Advertisement

सरवडे - आकनूर (ता. राधानगरी) येथे काल रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन बंद घरांना लक्ष्य करत घरफोड्या केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सलग दोन घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

येथील इलाई दादासो मुल्लाणी यांचे घर दत्त मंदिर व गहिनीनाथ मंदिर परिसरात आहे. मुंबई येथे स्थायिक आहेत. त्यांचे घर बंद आहे.त्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (जुबे) चोरून नेण्यात आले.

Advertisement

विशेष म्हणजे चोरीचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील चोरट्यांनी पळवून नेल्याचे निष्पन्न झाले आहे.या प्रकरणी फिर्यादीवरून राधानगरी पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दुसरी घरफोडी खिंडी व्हरवडे -आकनूर या रस्ता परिसरात घडली आहे. येथे गजानन रंगापुरे यांचे घर भरवस्तीत असून ते पुणे येथे वास्तव्यास आहेत.

घर अनेक दिवसांपासून बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटे फोडून सामानाची उलथापालथ करण्यात आली असून नेमकी किती व काय चोरीला गेले याचा तपास सुरू आहे.परिसरात सतत चोरीच्या घटना घडत आहेत. रात्री पोलीस गस्त वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.

Advertisement
Tags :

.