For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बदायूंमध्ये दोन मुलांची हत्या, आरोपीचा एन्काउंटर

06:22 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
बदायूंमध्ये दोन मुलांची हत्या  आरोपीचा एन्काउंटर
Advertisement

उत्तरप्रदेशातील बदायूंमध्ये तणाव : एक आरोपी फरार

Advertisement

वृत्तसंस्था/ बदायूं

उत्तरप्रदातील बदायूंमध्ये ठेकेदार विनोद ठाकूर यांचे पुत्र आयुष (13 वर्षे) आणि अहान (6 वर्षे) यांची चाकूने गळा चिरून मंगळवारी हत्या करण्यात आली. ठाकूर यांच्या घरासमोर हेयर सलून चालविणाऱ्या साजिदने स्वत:च्या दोन सहकाऱ्यांसोबत या हत्या केल्या होत्या. या घटनेच्या तीन तासांनी पोलिसांनी घटनास्थळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर एका चकमकीत साजिदला ठार केले आहे. तर चकमकीत पोलीस निरीक्षक गौरव विश्नोई जखमी झाले आहेत.

Advertisement

साजिदने अत्यंत क्रूरपणे दोन्ही मुलांची हत्या केली होती. त्याचे दोन्ही हात मुलांच्या रक्ताने माखलेले होते. हत्येनंतर साजिदने पळ काढला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला होता. शेखुपूरच्या जंगलात तो लपल्याचे कळल्यावर परिसरात शोध सुरू करण्यात आला होता.

पोलिसांना पाहून आरोपी साजिदने प्रथम गोळीबार केला, यामुळे आम्हाला स्वसंरक्षणासाठी गोळीबार करावा लागला, यात आरोपी साजिद मारला गेला. तर पोलीस निरीक्षक विश्नोई जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली. साजिदचा साथीदार जावेद सध्या फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

मुलांची हत्या कळताच संतप्त लोकांनी साजिदच्या दुकानातील सामग्री पेटवून दिली आहे. तसेच जमावाने जाळपोळ केल्याने बदायूंमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे प्रशासनाने तेथे मोठा बंदोबस्त ठेवला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची माहिती जाणून घेत अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

Advertisement
Tags :

.