कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेतमड्डी - काकोडा कालव्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू

06:40 AM Feb 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ कुडचडे

Advertisement

कुडचडे येथे गेल्या शनिवार दि. 25 रोजी संध्याकाळी एका सायकलस्वार विद्यार्थ्याचा स्वयंअपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर बरोबर आठ दिवसांनी अशीच एक दुर्घटना शनिवारी बेतमड्डी, काकोडा येथे घडली आहे. या दुर्दैवी घटनेत रेहान सादिक शरिती (वय 15 महिने) व वदिद अश्पाक हास्मी (वय 18 महिने) या दोन बालकांचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती कुडचडे पोलिसांनी दिली.

Advertisement

धावडशेत, काकुम•ाr-कुडचडे येथे भाड्याने राहत असलेल्या दोन कुटुंबांवर यामुळे दु:खाचे आभाळ कोसळले असून वरील दोन वर्षांहून लहान वयाच्या दोन मुलांना शनिवारी सकाळच्या सुमारास सदर वाहत्या कालव्यात बुडून मृत्यू आला. या घटनेमुळे कुडचडे, केपे, सांगे व इतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र ही मुले त्या कालव्याजवळ नेमकी कशी पोहोचली आणि तेथे नेमके काय घडले याची माहिती स्पष्ट होऊ शकलेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली असून दोन्ही बालकांचे मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठविले आहे. या घटनेचा अधिक तपास निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अऊण अँड्य्रू करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर दोन्ही मुले धावडशेत, शिवनगर येथे राहत होती. तेथून सदर कालवा अंदाजे साठ मीटरवर आहे. पण सदर मुले तेथे कशी आली व ती कशी बुडाली यासंबंधी कोणतीच माहिती आपल्याला नाही. ही घटना अत्यंत दु:खदायक असून त्यांच्या आई-वडिलांना हे दु:ख सहन करण्याची ताकद देव देवो, असे या घटनेची माहिती देताना माजी नगरसेवक आगुस्तीन मोराइzस यांनी वार्ताहरांना सांगितले

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article