For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारवारमध्ये आग लागून ऑटोरिक्षासह दोन कार जळून खाक

12:07 PM Dec 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
कारवारमध्ये आग लागून ऑटोरिक्षासह दोन कार जळून खाक
Advertisement

कारवार : आग लागून एका ऑटोरिक्षा आणि दोन कार जळाल्याची घटना सोमवारी रात्री कारवार तालुक्यातील अमदळ्ळी येथे घडली. अॅटोरिक्षा आणि कार जळून खाक झाल्याने लाखो रुपयांची हानी झाली आहे. अॅटोरिक्षामध्ये बसविण्यात आलेल्या एलपीजी किटचा स्फोट होवून ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. शिफरीन थॉमस फर्नांडीस यांच्या मालकीची बजाज मॅक्झिमो अॅटोरिक्षा आणि मारुती स्वीफ्ट कंपनीची एक पेट्रोल आणि दुसरी डिझेलची कार घरासमोर थांबविण्यात आली होती. सोमवारी रात्री अॅटोरिक्षामध्ये बसविण्यात आलेल्या एलपीजी किटचा अचानकपणे स्फोट झाला आणि त्यानंतर अॅटोरिक्षा व शेजारी बसविण्यात आलेल्या कारनी पेट घेतला. वाहनांची आग लागल्याची माहिती तातडीने कारवार येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे वाहन तातडीने दाखल झाले. पण अरुंद रस्त्यामुळे वाहन घटनास्थळी दाखल होवू शकले नाही. पुढे स्थानिकांनी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होवून आग विझविली. तथापि, तोपर्यंत तिन्ही वाहने जळून खाक झाली आणि लाखो रुपयांची हानी झाली. कारवार ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून पाहणी केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा एलपीजी किटच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.