For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोलझर वृक्षतोडप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल

03:47 PM Jan 13, 2026 IST | अनुजा कुडतरकर
कोलझर वृक्षतोडप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल
Advertisement

दोडामार्ग : प्रतिनिधी

Advertisement

कोलझर येथे खाजगी जंगलक्षेत्रात झालेल्या वृक्षतोडप्रकरणी वनविभागाने ठोस पावले उचलली आहेत. या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्याबरोबरच येथे झालेल्या वृक्षतोडीचा रितसर पंचनामा करण्यात आला. कोलझर येथील डोंगरात काही अज्ञातांनी सुमारे ४ किलोमीटर लांबीचे उत्खनन केले होते. हा परिसर केंद्र सरकारने इकोसेन्सिटीव्ह एरिया म्हणून जाहीर केला आहे. स्थानिकांच्या मालकी क्षेत्रात विनापरवाना घुसून हे उत्खनन झाले होते. या क्षेत्रात मोठ्याप्रमाणात जंगली झाडे तोडून ती मुळासकट चोरून नेण्यात आली होती. स्थानिकांना याबाबत समजताच त्यांनी या विरोधात भुमिका घेतली. या उत्खननाची आणि वृक्षतोडीची माहिती मिळताच खडपडे वनक्षेत्रातील पथकाने पंचनामा केला. याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हाही दाखल करण्यात आला. ही कारवाई वनपाल किशोर जंगले, वनरक्षक सुबोध नाईक यांनी केली. याबाबत वनपाल जंगले म्हणाले, “इकोसेन्सिटीव्ह एरियात झालेल्या या कृत्याची माहिती मिळताच आम्ही तातडीने पंचनामा व इतर प्रक्रिया पूर्ण केली. तेथील मोजमापे घेण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू असल्याने त्यांची नावे अद्याप उघड केलेली नाहीत. या भागातील पर्यावरण राखण्याची जबाबदारी आम्ही सक्षमतेने पार पाडत आहोत. ग्रामस्थ पर्यावरण रक्षणासाठी पुढे येत असल्याची गोष्ट समाधानकारक आहे. त्यांना या कार्यात कायम सहकार्य मिळेल.”

Advertisement
Advertisement
Tags :

.