बुधगाव येथे भाजपच्या दोघा ग्रा. पं. सदस्यांना मारहाण
सांगली :
बुधगाव (ता. मिरज) येथील ग्रामपंचायत दोन सदस्यांसह तिघांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ग्रामपंचायत सदस्य अविनाश विक्रम पाटील (३०) यांच्यावर कोयत्याने हल्ला करत गंभीर जखमी करण्यात आले. पुर्वीच्या वादातूनच हा हल्ला झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मनोहर बसंत पाटील (४०) आणि संभाजी रंगराव पाटील (४८, सर्व रा. बुधगाव) जखमी आहेत.
मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. यातील जखमी अविनाश पाटील यांना गोसावी गल्लीतील ५० ते ६० लोकांनी बेदम मारहाण केली. यात ते जखमी झाले. लाकडी दांडके, कोयते, काठ्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. जिवाच्या आंकाताने ते राजवाडयाच्या दिशेने पळत सुटल्याने ते बचावले. त्यांच्या डोकीस गंभीर मार लागला. हाणामारीनंतर बुधगावच्या माळभागावरील दुकाने भितीने बंद केली. पोलीसांनी गावात धाव घेवून गोसावी गल्लीच्या कोपऱ्यावर जमलेल्या जमावाला पिटाळून लावले. दरम्यान, जखमी पाटीलवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या आई वैशाली पाटील बुधगवाच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की अविनाश पाटील हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. बुधगाव होता. राजवाडा परिसरातील एका रस्त्याचे काम सुरू होते. विरोधी गटाच्या एकाने त्याठिकाणी आला. कामाची पाहणी केली. त्यानंतर ठेकेदार संभाजी पाटील यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांना मारहाणही करण्यात आली. सरपंचांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा जाब विचरण्यासाठी अविनाश पाटील हे संशयिताकडे गेले. त्यावेळी त्यांच्या पुन्हा वाद झाला. संशयिताने अविनाश पाटील यांच्या डोक्यात वार केला. यावेळी मनोहर पाटील यांनाही मारहाण केली. अविनाश है रक्तबंबाळ अवस्थेत असताना त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. शासकीय रुग्णालय परिसरात गर्दी होती. ग्रामपंचायतीच्या मालकीचे भूखंड सुरक्षित ठेवण्याचा जाहीरनामा केला होता. तेव्हापासून संशयित आणि पाटील यांच्यात वाद सुरू होता.