For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभेत आज दोन विधेयके मांडणार

06:46 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
लोकसभेत आज दोन विधेयके मांडणार
Advertisement

एफसीआरए दुरुस्ती विधेयकावर सर्वांची नजर : विरोधकांकडून गोंधळ शक्य

Advertisement

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

Advertisement

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा आजपासून सुरू होणार आहे. सरकार या आठवड्यात स्वत:च्या अजेंड्याला वेग देण्याच्या तयारीत आहे. लोकसभेत दोन नवी विधेयके मांडली जाणार आहेत, तर अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांना संमत करविण्याचा प्रयत्न होणार आहे. याचबरोबर अर्थमंत्री निर्मला सीतारामन देखील सभागृहात महत्त्वपूर्ण वित्तीय दस्तऐवज सादर करणार आहेत.

लोकसभेत आज इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टीट्यूट विधेयक, 2026 आणि बँकर्स बुक्स एविडेन्स विधेयक, 2026 सादर करण्यात येणार आहे. या दोन्ही विधेयकांना सरकार औपचारिक स्वरुपात मांडणार आहे. सरकार चालू आठवड्यात रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ्स अँड डेथ्स (दुरुस्ती) विधेयक, 2026 आणि सर्वोच्च न्यायालय (न्यायाधीशांची संख्या) दुरुस्ती विधेयक, 2026 देखील लोकसभेत संमत करविण्याचा प्रयत्न करणार आहे. ही दोन्ही विधेयकं सरकारच्या प्रमुख अजेंड्यात सामील आहेत.

एफसीआरए दुरुस्ती विधेयक

सरकार आगामी दिवसांमध्ये एफसीआरए दुरुस्ती विधेयक देखील लोकसभेत मांडू शकते. या प्रस्तावित विधेयकावर राजकीय पक्ष तसेच विविध स्वयंसेवी संस्थांची नजर लागून राहणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 च्या अतिरिक्त अनुदानाच्या मागण्यांशी संबंधित तपशील लोकसभेत सादर करतील. हे सरकारच्या वित्तीय कामकाजाशी निगडित महत्त्वपूर्ण संसदीय दस्तऐवज आहे.

गोंधळ जारी राहण्याची चिन्हे

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवड्यात विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे फारसे कामकाज होऊ शकले नाही. जंतर-मंतर येथील नीट-युजी पेपर लीकच्या विरोधातील निदर्शने आणि त्याच्याशी निगडित मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सातत्याने सरकारची कोंडी करू पाहत आहेत. यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज अनेकदा स्थगित करावे लागले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू झाले होते आणि 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. तिसऱ्या आठवड्यात सरकार प्रलंबित विधेयकांना संमत करविण्याचा जोरदार प्रयत्न करणार आहे.

Advertisement
Tags :

.