Gadhinglaj News | गडहिंग्लज-संकेश्वर मार्गावर दोन दुचाकींचा भीषण अपघात; अपघातात चौघे जखमी
गडहिंग्लजमध्ये दुचाकींची समोरासमोर धडक
गडहिंग्लज -गडहिंग्लज संकेश्वर मार्गावरील निलजी-नूल रोडवर सोमवारी रात्री समोरासमोर झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातात चौघे जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलीसात झाली आहे.
अधिक माहिती अशी की, बाबू कंम्पान्नपा हानमाज (वय ५० रा. दुंडगे ता. गडहिंग्लज) हे आपल्या ट्रकवर असणारे ड्रायव्हर संजय आनंदराव विचारे यांना सोमवारी रात्री ११.३० वाजता आपल्या बॉक्सर गाडीवरून हणमंतवाडी या गावी सोडायला जात होते.
तेवढ्यात नूलवरून रॉयल इनफिल्ड गाडीवरून येणारे आदित्य सुभाष काळे (रा. नूल) यांने कांता बोबडे यांच्या घरासमोर आल्यानंतर बाबू यांच्या गाडीला समोरून धडक दिल्याने बाबू हानमाज आणि संजय विचारे खाली पडले.
या अपघातात त्यांच्या हाता-पायाला दुखापत झाली आहे. तर समोरील गाडीवरील आदित्य आणि मागे बसलेल्या इसमाला देखील दुखापत झाली आहे. जखमी बाबू आणि संजय यांच्यावर गडहिंग्लज येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार असून बाबू हानमाज यांनी आदित्य सुभाष काळे यांच्याविरूध्द गडहिंग्लज पोलीसात फिर्याद दिली आहे.