For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोणंद येथे टोळक्याची दोघांना कोयता, दांडक्याने मारहाण

05:15 PM Apr 10, 2025 IST | Radhika Patil
लोणंद येथे टोळक्याची दोघांना कोयता  दांडक्याने मारहाण
Advertisement

लोणंद :

Advertisement

लोणंद गावच्या हद्दीत महावीर चौक येथे सहा जणांच्या टोळक्याची दोघांना कोयता, दांडक्याने तसेच लाथाबुक्यानी मारहाण केली असून लोणंद पोलीस स्टेशन येथे आण्णा जाधव, विशाल जाधव (पूर्ण नाव माहित नाही) व इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री ११.०० वाजण्याच्या सुमारास अनिकेत जालिंदर माने व त्याचा मित्र आकाश दत्तात्रय शेळके असे महावीर चौक (लोणंद) येथून घरी जात असताना अण्णा जाधव, विशाल जाधव रा. शास्त्री चौक (लोणंद) व इतर चार जण असे त्यांच्याजवळ येऊन तुम्ही इथे काय करताय, कशासाठी उभे राहिला आहे. मगाशी आम्हाला तुम्ही दोघांनी धक्का दिला का असे म्हणून अनिकेत माने याला डोक्यात कोयत्याने, दांडक्याने खांद्यावर मारहाण केली तसेच त्याचा मित्र आकाश दत्तात्रय शेळके रा. वेताळ पेठ लोणंद यास पायाचे मांडीला मारहाण केली. तसेच त्यांच्याबरोबर असलेली अनोळखी ४ इसमानी शिवीगाळ, दमदाटी करून लाथा बुक्क्याने मारहाण केली आहे. अशी फिर्याद अनिकेत माने याने लोणंद पोलीस स्टेशनला दिली असून लोणंद पोलीस स्टेशन येथे सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

  • पोलिसांचा धाक उरला नाही

लोणंद शहर ही मोठी बाजारपेठ असून गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. मागील पाच दिवसापूर्वीच लोणंद येथे एकाचा छातीत चाकू भोसकून निघृण खून करण्यात आला होता आणि युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार करण्याची या आठवड्यातील दुसरी घटना आहे. लोणंद शहरात मागील आठवड्यापासून खून, धारदार शस्त्राने मारहाण होण्याचे प्रकार वाढल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. सध्या किरकोळ कारणातून मारामारी आणि मारामारीच्या घटनांमध्ये घातक हत्यारे सहजपणे खुलेआम बाहेर काढली जात आहेत. पोलिसांचा धाक गुन्हेगारांना उरला नसल्याचे दिसत आहे.

Advertisement
Tags :

.