For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दीड कोटी किंमतीच्या द्रवरूप सोन्यासह दोघांना अटक

06:22 AM Jul 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
दीड कोटी किंमतीच्या द्रवरूप सोन्यासह दोघांना अटक
Advertisement

तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला : गोवा गुन्हा शाखेकडून  कारवाई

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

पणजी : शनिवारी केलेल्या एका कारवाईत सोन्याच्या त्स्करीचा प्रयत्न गोवा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हाणून पाडला आहे. या कारवाईत 1 कोटी 50 लाख ऊपये किंमतीचे द्रवऊप सोने जप्त केले असून दोघा संशयितांना अटक केली आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये हसन मूस नियाज (वय 35), मुहम्मद खुन्ही (वय 57) यांचा समावेश असून दोघेही कासारगोड- केरळ येथील आहेत. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हा शाखेने  ही कारवाई केली आहे. संशयित हसन नियाझ द्रवरूप सोन्याचा साठा घेऊन कतार एअरवेजच्या विमानाने दुबईहून गोव्याला आला होता. दुसरा संशयित मुहम्मद खुन्ही केरळमधील कासारगोड येथून रेल्वेने मडगावला आला आणि त्यानंतर हसन नियाझकडून माल घेण्यासाठी मोपा विमानतळावर गेला होता. त्यानंतर, दोन्ही आरोपी एकत्र प्रवास करत असताना धारगळ येथील सुकेकुळण येथे पोलिस पथकाने त्यांना अडवले.

त्यांची कायदेशीर झडती घेतल्यावर, पोलिस पथकाला आढळून आले की, दोन्ही संशयितांनी घातलेल्या बनियान आणि अंतर्वस्त्रांमध्ये द्रवरूप सोने लपवलेले होते. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन करून त्यांच्या ताब्यातून लपवलेले द्रवऊप सोने जप्त करण्यात आले.

जप्त केलेल्या द्रवरूप सोन्याचे एकूण वजन अंदाजे 1 किलो 300 ग्रॅम इतके आहे. संशयित गुन्हा शाखेच्या ताब्यात असून, सीमाशुल्क कायदा आणि इतर कायद्यांच्या तरतुदींनुसार पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी त्यांना म्हापसा येथील सीमाशुल्क प्राधिकरणाकडे सोपवण्यात येणार आहे.

हे यशस्वी शोधकार्य पोलिस उपमहानिरीक्षक वेद प्रकाश सूर्य यांच्या एकूण देखरेखीखाली अधीक्षक राहुल गुप्ता, जीवबा दळवी, निरीक्षक तुषार लोटलीकर,  निखिल पालेकर यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक, तसेच हवालदार जयेश तारी, पोलिस कॉन्स्टेबल संदेश वळवईकर, दत्तात्रय शेट वेर्णेकर सुभा गावकर आणि जतीश नाईक यांनी ही कारवाई केली आहे.

Advertisement
Tags :

.